या देशांचे आहेत ‘हे’ राष्ट्रीय प्राणी
या देशांचे आहेत ‘हे’ राष्ट्रीय प्राणी जरा हटके , सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / तथ्य , राष्ट्रीय प्राणी , रोचक / September 26, 2019 ♨️प्रत्येक देशाची राष्ट्रीय चिन्हे त्या त्या देशाचे प्रतीक असतात. या चिन्हांमध्ये ध्वज, प्राणी, पक्षी, इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. पण काही देशांनी आपल्या राष्ट्रीय चिन्हांची निवड करताना कल्पकतेचा वापर केलेला आढळतो. उदाहरणच द्यायचे झाले, 👉तर स्कॉटलंडचे देता येईल. या देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘ युनिकॉर्न ’ आहे. कपाळावर लहानसे शिंग असणारा हा घोडा खरे तर काल्पनिक आहे. पण तेराव्या शतकामध्ये या काल्पनिक प्राण्याची लोकप्रियता इतकी जास्त होती, की हा प्राणी खरोखरच अस्तित्वात असावा अशी लोकांची ठाम समजूत होती. अनेक आख्यायिकांच्या अनुसार युनिकॉर्न अतिशय बलशाली प्राणी असून, एखाद्या हत्तीहूनही अधिक ताकद या प्राण्यामध्ये होती. म्हणूनच शक्तीचे प्रतीक असलेल्या या प्राण्याची निवड स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी म्हणून करण्यात आली. ♨️भूटानच्या ध्वजावर दिसणारा भयंकर आक्राळ-विक्राळ ‘ द्रुक ’ नामक ड्रॅगन ...