किरण सरोदे

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खूप विद्वान महामानव होते. त्यांची ज्ञान चिन्ह म्हणून ओळख आहे. मी स्वतः ला इतका लायकीचा समजत नाही की मला त्यांच्या गोष्टी खटकतील,,, तरी पण काही प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत . कदाचित माझा सभ्यास कमी असेल म्हणून,,,,, तरी तुम्ही त्या गोष्टी मला लक्षात आणून दया .

  1. राष्ट्रीय स्वंसेवक संघाची स्थापना 1925 रोजी दसऱ्याच्या दिवशी नागपूर मध्ये झाली , आणि ती संघटना हिंदुवादी संघटना म्हणून ओळखली जाते
  2. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये बौध्द धम्माची दीक्षा घेतली.

  1.  त्यांचा हिंदू धर्माला विरोध असताना 
  2. त्यांनी दसरा या दिवसाची निवड केली ,, आणि 
  3. योगायोगाने शहर पण नागपूरच निवडलं …त्याचा 
  4. दुष्परिणाम म्हणजे हार्दिक पटेल सारखे राजकारणी अजून पण भाषणात बोलतात की ,,"नागपूर दीक्षा भूमी आहे आरएसएस ची भूमी नाही" ,, म्हणजे जातीवाद करण्यासाठी अशा लोकांना जागा मिळाली.
  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मण समाजातील काही पंडितांनी जातीवाचक शब्द वापरले 
  6. त्यांना त्याचा आयुष्यभर त्रास झाला आणि 
  7. त्या संपूर्ण दुबळ्या आणि गरीब समाजाला काही जातीवादी पंडितांनी सतत जाच केला परिणामी बाबासाहेबांनी आपल्या समाज बरोबर घेऊन बौध्द धर्मात प्रवेश करण्याचा योग्य निर्णय घेतला,, 
  1. पण मला हा प्रश्न पडतो की ते पुस्तकाचे वाचक होते मग त्यांनी वेध पुराण आणि गीता नक्कीच वाचली असणार. म्हणजे हिंदू धर्मात वाईट शिकवत नाही 
  2. आणि विज्ञानाच्या पुढचा किंवा विज्ञानाला धरून हा धर्म आहे, जगण्याची एक पद्धत आहे ,हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक परंपरेचं काही ना काही तथ्य किंवा शास्त्रीय कारण आहे हे त्यांनी जाणून घेतलच असणार .
  3.  तरी पण त्यांनी धर्म परिवर्तन केल्या नंतर.         हिंदू धर्माची वाभाडे काढलेले मी भरपूर पुस्तकात वाचले.. ( गौतम बुध्द आणि त्यांचा धम्म, आंबेडकर आणि त्यांचा धम्म) परिणामी नवंबौध्द समाजात हिंदू धर्माविषयी काही प्रमाणात तिरस्कार निर्माण झाला , तो आजही आपल्याला जाणवत आहे. .. आणि त्याचा त्रास पण होत आहे. म्हणजे काही जातीवादी पंडितांनी केलेल्या चुकीची शिक्षा पूर्ण हिंदू धर्माला भोगावी लागत आहे अस एकंदरीत वाटत.
  4. त्यांनी आपल्या समाजाचं धर्मपरिवर्तन करण्याच्या आगोदर किंवा नंतर त्यांना महात्मा बुद्धांची शिकवण देण गरजेचं होत. त्याचा आभाव आज पण जाणवतोय. आज सुद्धा आमचे बंधू महात्मा भगवान गौतम बुद्धांना वाचतील आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जातील हीच इच्छा आहे . भरपूर लोक ते करत पण आहेत . त्यांचे अभिनंदन

हे मला पडलेले प्रश्न आहेत. कोणाची मने दुखावण्याचा माझा हेतू नाही. माझे काही चुकीचं असेल तर कमेंट मध्ये मला सांगा …

जय भीम , जय श्रीराम , जय हिंद 🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

पुराणकथा

MAHMUD GAWAN, 1411-1481 A.D.

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?