बाजीराव-मस्तानींचा मुलगा समशेर बहाद्दूरचे काय झाले, वाचा इतिहास...
बाजीराव-मस्तानींचा मुलगा समशेर बहाद्दूरचे काय झाले, वाचा इतिहास...
6 वर्षांपूर्वी

बाजीराव आणि मस्तानीचे तैलचित्र
पुणे - मस्तानी इराणी होती की अफगाणी, ती राजा छत्रसालाची जैविक पुत्री होती की मानलेली? बाजीरावांचे निधन झाल्यानंतर ती जिवंत होती की तिचा मृत्यू झाला, अशा अनेक प्रश्नांची उकल वेगवेगळ्या इतिहासकारांनी आपआपल्या संशोधानुसार केली. कुणाच्या मते चिमाजी अप्पाला ती भेट मिळाली होती त्यांनी ती बाजीरावला दिली तर कुणाच्या मते राजा छत्रसेनची ती मानलेली पुत्री होती. असे असताना बाजीरावला मस्तानीपासून झालेल्या पुत्र समशेर बहाद्दूर हाच होता, याविषयी सर्वच इतिहासकारांचे मत सारखेच आहे. बाजीराव आणि मस्तानी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या पुत्राचे काय झाले, याची खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
कधी झाला समशेर बहाद्दूर ?
बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानीला विशेष स्थान होते. बाजीरावांसोबत असलेल्या संबंधामुळे मस्तानीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागला. एवढेच नाही तर बाजीराव पुण्यात असताना तिला ठार मारण्याचा प्रयत्नही झाला. शिवाय आयुष्याच्या शेवटी तिला पुण्यातील पर्वती बागमध्ये कैद करून ठेवले होते. तिला बाजीरावांकडून वर्ष 1734 मध्ये एक पुत्र झाला. तोच पुढे समशेर बहाद्दूर.
Comments
Post a Comment