मांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची यात्रा


मांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची यात्रा

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील मांगरूळ गावात पर्वतरांगांच्या कुशीत, अगदी उंच डोंगरावर श्रीचिंचेश्वर देवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ तर मागील बाजूस वठलेला वटवृक्ष आहे. शिवाय बाजूला दाट वनराईही आहे. मंदिरापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी वारणा नदी आहे. ग्रामस्थ आणि चिंचेश्वराच्या भक्तांनी मिळून उंच टेकडीवर असलेल्या त्‍या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या गाभा-यात चिंचेश्वराची मूर्ती आहे. आजही त्‍या देवाची आख्यायिका लोक मोठ्या भक्तिभावाने सांगतात.

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)