लऊळचे संत कुर्मदास

लऊळचे संत कुर्मदास

संत कुर्मदास हे पैठणचे. त्यांना हाताचे पंजे आणि पायाला पावले नव्हती, तरी त्यांनी पंढरीच्या वारीचे वेड घेतले. त्यामागे एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांची प्रेरणा होती. कुर्मदास पैठणहून लोटांगण घालत वारीस निघाले. एकादशीला तीन दिवस उरलेले असताना त्यांच्या लक्षात आले, की त्यापुढे त्यांना आयुष्य नाही. त्यांनी जेथे देह ठेवला तेच लऊळ गाव. ते गाव सोलापूरच्या माढा तालुक्यात आहे. संत कुर्मदास जेथे पडले, तेथे विठ्ठल-रुखमाईचे मंदिर असून त्यासमोर कबरीसदृश स्मारक आहे. मात्र महाराजांच्या समाधीचे स्थान स्वतंत्र आहे. ते देऊळ औरंगजेबाने बांधले असे म्हणतात. अर्थात हा चमत्कारच! मात्र त्या समाधी स्थळी सेवेकरी मुस्लिम आहेत. ब्राम्हणांतर्फे पूजा केली जाते आणि मराठ्यांकडे वात लावायची प्रथा आहे. मंदिरात आणि समाधीस्थळी अहर्निश सतत दिवा तेवत ठेवला जातो.

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)