माणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम

माणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम

माणकेश्वर गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्याबार्शी – भूम रस्त्यावर आहे. गाव भूम तालुक्यात आहे. ते बार्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वर गावाची लोकसंख्या चार-पाच हजार. तो कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आजुबाजूचा परिसर सपाट जमिनीचा असून, जमीन काळी ते हलक्या स्वरूपाची आहे. ज्वारी, बाजरी, तूर, कापूस अशी हंगामी व पावसाळी पिके.

माणकेश्‍वर गावची शिव-सटवाईची मंदिरे प्रसिद्ध आहेत. दोन्‍ही देवतांची मंदिरे शेजारी आहेत. त्‍यामुळेे त्‍यांचा उल्‍लेख एकत्रितपणे 'शिव-सटवाई' असा केला जातो. त्‍यापैकी शिवमंदिर हे माणकेश्‍वर मंदिर या नावाने प्रचलित आहे. ते भूमिजा शैलीतील आहे. लोक त्यांच्या घरच्या लहान मुलांचे जावळ (केस) काढण्यासाठी शेजारी असलेल्‍या सटवाई देवीला सतत येत असतात. सटवाई ही ग्रामस्थ देवी. शेंदूर लावलेले लंबुळाकार असे तिचे रूप असते. तिची मूल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी ‘सष्टी’ पुजण्याचा प्रघात आहे. त्या दिवशी सटवाई मुलाचे भाग्य त्याच्या कपाळावर लिहिते असा समज आहे. सटवाईच्या भोवती दोन किंवा तीन फूट फंच दगड रचून केलेला आडोसा असतो (बांधकाम केलेले नसत).

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)