माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर

 

माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर

मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्‍या काळात त्‍याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्‍या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.

Comments

Popular posts from this blog

पुराणकथा

MAHMUD GAWAN, 1411-1481 A.D.

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?