Skip to main content

आख्यायिका (legend)



‘लेजंड’ हा आख्यायिकांचा इंग्रजी प्रतिशब्द होय. मात्र आरंभी या शब्दाने चर्चमधून वाचली जाणारी संतचरित्रे सूचित होत. Legenda Aurea (इं. शी. गोल्डन लेजंड) या नावाने अशी काही संतचरित्रे तेराव्या शतकात ग्रंथबद्धही झाली. संतांच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेभोवती अद्‌‌भुतरम्यतेचे वलय निर्माण करण्यासाठी अशा संतचरित्रांतही कल्पिताचा प्रवेश होऊन हळूहळू आजचा अर्थ लेजंडला प्राप्त झाला असावा. चॉसरने (१३४० ?–१४००) क्लीओपात्रासारख्या काही जगप्रसिद्ध स्त्रियांच्या कथा लेजंड ऑफ गुड विमेन या नावाने लिहिल्या. अँग्लोसॅक्सन इतिहासकारांनी आपल्या राजांचा वंशारंभ येनकेनप्रकारेण आदमपर्यंत नेऊन पोहोचविण्याच्या उद्देशाने अनेक आख्यायिका निर्माण केलेल्या आहेत.

राजा आर्थर ही इंग्लंडमधील अनेक आख्यायिकांचा विषय झालेली व्यक्तिरेखा होय. काव्य–नाटकादी साहित्यकृतींत आख्यायिकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केलेला दिसतो. ज्ञानदेवांनी चालविलेली भिंत, त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविणे, तसेच तुकारामांची इंद्रायणीत बुडविलेली अभंगांची पोथी जशीच्या तशी कोरडी वर येणे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आख्यायिका होत.

पहा :  लोकसाहित्य.

Comments

Popular posts from this blog

पुराणकथा

MAHMUD GAWAN, 1411-1481 A.D.

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?