आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?
आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय? श्री.गोविंदप्रभू हे गुंडम राऊळ, गुंडम स्वामी या नावानेही प्रख्यात आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांचे गुरू असलेल्या श्री गोविंद प्रभू ची महानुभाव संप्रदायातील 'पंचकृष्ण' संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. श्री. गोविंदप्रभू यांचा जन्म ११८७ मध्ये 'अनंतनायक व नेमाईसा' या काण्वशाखीय ब्राह्मण दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर (रिधपूर) जवळील काटेसूर हे होते. ते लहान असतांनाच त्यांच्या मात्यापित्याचे छत्र हरवले, त्यामुळे त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशीने रिद्धपूर येथे केला. बोपो उपाध्ये यांच्याकडे त्यांनी वेदाध्यन केले. श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरुसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण...
Comments
Post a Comment