गावकुसाबाहेरची मिथके
विरा राठोड

गावकुसाबाहेरची मिथके
5 वर्षांपूर्वी

भारतीय समाजाची संस्कृती आणि इतिहास मिथकं अर्थात मिथककथा, प्राक्कथा, दंतकथा, पुराणकथा, दैवतकथा, दिव्यकथा आदींनी ओतप्रोत भरलेला आहे. भारतीय समाजमनावर, धर्मसंकल्पनांवर, संस्कृतींवर, पर्यायाने एकूण जगण्यावरच या सर्व कथांचा विलक्षण पगडा गेली हजारो वर्षे राहिलेला आहे...
भारतातल्या प्रत्येक जाती-धर्म आणि जमातींच्या उत्पत्तीविषयी अनेक मिथककथा आढळतात. चातुर्वर्णात कुणी तोंडातून, कुणी कंठातून, कुणी कानातून, कुणी कपाळ, कुणी लिंग, तर कुणी अंगावरच्या मळातून जन्म घेतो. कुणाचा जन्म धरणी फाटून होतो, तर कुणाला कुमारी माता म्हणून वर मिळतो. ज्यांना वर्णव्यवस्थेत स्थान मिळाले नाही, त्यांच्यावरही अशा चमत्कारिक कथा लादल्या गेल्या. त्यांनीही अंधश्रद्धेला शरण जात आपल्या उत्पत्तीच्या दंतकथा गळ्यात अडकवून घेतल्या आणि येणाऱ्या पिढ्यांना तोच आपला धर्म म्हणून सांगितला. तीच संस्कृती म्हणूनही रूढ झाली. उत्पत्ती कथेतल्या धर्माने जे सांगितले तेच त्यांचे जगणे झाले. ते नाकारले तेव्हा धर्म भ्रष्ट झाला, म्हणून पुन्हा नाना कुप्रथा निर्माण केल्या गेल्या. अघोरी स्वरूपाच्या छळांचा जन्म झाला. कपोलकल्पित धर्मसमजुतींनी हजारो वर्षे माणूस बाटवला, नागवला, नासवला. एवढेच नाही, तर त्याच्यातला माणूसच मारून त्याला जनावर करून टाकले.

यातूनच अनेक जमाती भीक मागून उष्टे खाण्यातच धन्यता मानू लागल्या. काही तर आपणाला देवानेच हे वर दिलेत, म्हणून आहे त्या अवस्थेत राहू लागल्या. भीक मागण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या. मरीआईचे भगत, अंबाबाईचे भगत, कडकलक्ष्मी, जोगते, जोगतिणी, खंडोबाचे वाघे, भैरवनाथाचे भगत, पोतराज, कृष्णभक्त वासुदेव, शंकराचे भक्त म्हणून अंगाला राख लावून भिक्षा मागणारे मसणजोगी, चुडबुडे, कुडमुडे, पांगुळ, राम-हनुमानाचे चित्र काढून भीक मागणारे चित्रकथी आदी समाज आपली अस्मिता गमावून बसले. त्यातही ज्यांनी व्यवस्थेविरोधात विद्रोह केला त्यांच्या मानगुटीवर जात पंचायत बसली. जातीतून बाहेर टाकण्यापर्यंत या जात पंचायतींची मजल गेली.
भटक्या-विमुक्तांच्या जातीजमाती आपल्या जातनिर्मितीविषयी कथा सांगतात. राम, कृष्ण, इंद्र, हनुमान, सीता, शंकर-पार्वती आदी देवदेवता या कथांच्या केंद्रस्थानी आहेत. कधी इंद्राने शाप दिला म्हणून, तर कधी शंकर-पार्वतीच्या उ:शापातून आपली निर्मिती झाली, असे मोठ्या अभिमानाने कथन करतात. ‘वाघरी’ पारध्यांची उत्पत्ती अशीच आहे. ‘महादेव-पार्वती सारी सृष्टी वाटण्यासाठी बसले होते. पहिला मान ब्राह्मणाचा म्हणून त्यांना ग्रंथ दिले. नंतर एक एक करीत वाण्याला पैसा, शेतकऱ्यांना जमीन, सुतार, कुंभार, लोहाराला त्यांची हत्यारे, वडाराला सुतकी, कैकाड्याला कत्री, कळवातीला घुंगरू सारं काही वाटून झाल्यावर शेवटी वाघऱ्याला उरलेलं जाळं दिलं. यात तुला भरपूर शिकार मिळेल, ती फक्त तुझीच असेल, असं महादेवाने सांगितलं. पार्वतीने गाय दान दिली. पहिल्या फाश्यात हरीण पडलं म्हणून ‘हरिणपारधी, गायपारधी, फासेपारधी’ अशी नावं पडल्याच्या कथा प्रचलित झाल्या.
पौराणिक कथांमध्ये पारधी, ब्रह्म, मत्स, वायू व विष्णूपुराणात पारद नावाने असलेल्या या जमातीचे वर्णन पराभव करून दंड रूपात त्यांचे डोक्याचे केस काढून घेतले; ज्ञानसाधनेचे सर्व अधिकार हिसकावून घेतले गेलेले लोक, असे येते. याच पुराणांनी नैतिकतेची परीक्षा म्हणून उकळत्या तेलातील पुऱ्या काढायला लावल्या. नाही तर देवी दोष देते, असा समज तयार केला. ‘चवदा भवरा आणि चाचर’ काढून त्या ठिकाणी देवीच्या नावाने पारधी बळी देतात. त्या बळीचा जीव जाईपर्यंत देवी अंगात आणून बळीच्या नरडीला तोंड लावून एक एक जण रक्त पितो. रक्त पिताना तोंड वाकडं करू नये, नाहीतर देवी तोंडच वाकडं करून टाकते, असे मानले जाते. ‘कोल्हाटी’ या कलावंत जमातीची उत्पत्ती कथा अशी सांगितली जाते. इंद्राच्या दरबारात नाचगाणे करणारी गंधर्व कन्या अश्लील वर्तन, चाळे करू लागली. इंद्र देव संतापले. तिला दगडाची शिळा होशील, असा शाप दिला. त्याप्रमाणे ती पृथ्वीवर पडली. उ:शाप मिळावा म्हणून शंकराची उपासना करू लागली. शंकराने पार्वतीच्या हट्टापायी उ:शाप दिला आणि आणखी एक वर दिला. यापुढे तुझ्या पोटी जन्म घेणारी संतती कलावंत म्हणूनच जन्म घेईल आणि लोकांचे मनोरंजन करून पोट भरेल. शंकराच्या कृपेने तिला दिवस गेले. एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आले. मुलं मोठी झाली. मुलगा डोंबाऱ्याचा खेळ करू लागला. मुलगी नाच करू लागली. लोक मुलीकडे शरीरसुखाची मागणी करू लागले. तिला वाईट वाटले. तिने शंकराचा धावा केला. शंकर म्हणाले, ‘बेटी, तुझा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे. त्यात काही गैर नाही. लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांना तू खूश कर व पोट भर.’ साक्षात शंकरानेच लोकांशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितल्याने कृपाप्रसाद समजून ती नाचगाणे करत शरीरसंबंध ठेवू लागली. त्यातून पुढे मुले झाली. तोच त्यांचा वंशपरंपरागत धर्म झाला. यातूनच कोल्हाटी जमात स्वर्गातून पृथ्वीतलावर आली, असे मानतात.
रामायण, महाभारत आणि पुराणकथांवर आधारित वेगवेगळ्या प्रसंगांची चित्रे तयार करून रंग भरून पुराणकथा सांगणारा चित्रकथी समाज असेल, स्मशानात राहणारा आणि मृत व्यक्तीचे क्रियाक्रर्म करणारा मसणजोगी समाज असेल, तो चामुंडा व महाभैरव मानला जातो. कृष्णाचे वंशज म्हणून स्वत:ला संबोधणारा वासुदेव समाज डोक्यात मोरपिसांची टोपी वा मुकुट घालून फिरतो. कृष्णाचा मित्र पेंद्या आमचा पूर्वज आहे, असे वासुदेव लोक मानतात. हे लोक कृष्णाच्या क्रीडा नाचून गाऊन मनोरंजन करत भिक्षा मागतात. ‘वैदू’ लोकांमध्ये मुलगा वा मुलगी झाली तर ती नवसाने झाली, अशी धारणा असते. त्यामुळे ते अमरलदेवी, गंगा आसराचे नवस फेडतात. ‘टकम्यांची’ कुलदैवत यल्लमा देवी. तिचा ते नग्न होऊन नवस फेडतात. देवीसाठी वस्त्रांचा त्याग करून स्त्रिया संपूर्णपणे नग्न होतात. नग्न होणे म्हणजे देवीला आपला देह अर्पण करणे, असेही मानले जाते. नागडेपणाने देवीला प्रदक्षिणा घातली जाते. केसात जट निघाली म्हणून देवीला जोगतीण वा जोगत्या सोडून देण्याची प्रथा किती भयंकर आहे, हे आपण जाणतोच.
‘मरीआईवाले’ ही जमात लाकडापासून बनविलेला मरीआईचा देव्हारा, मरीआईचे देऊळ डोक्यावर घेऊन दारोदारी भीक मागतात. या जातीचा धर्मच मरीआई. याशिवाय मूळ जात धर्मच नाही. ‘कहार’ हे आपली उत्पत्ती महादेवाने धुळीपासून केली असे मानतात, म्हणून धुरीचा कहार. रामाला नदीपार करणारा, रावणाच्या लंकेला जाताना समुद्र पार करणारा कहार समाज होता. लंकेला जाण्यासाठी आम्हीच पूल बांधून दिला म्हणून राम लंकेला पोहोचला, असे ते म्हणतात. शिवाय महाभारतातील गंगा आणि सत्यवती म्हणजेच, कहारांच्या धीवर कन्या आहेत. राजांनी त्यांच्याशी विवाह करून वंश वाढवला. सत्यवतीचा पहिला मुलगा व्यास. त्यापासून महाभारताची निर्मिती झाली. म्हणून महाभारतातील मूळ वंश हा कहार जमातीचाच, अशी त्यांची धारणा आहे.
नंदी बैलवाला नंदी बैलाला महादेवाचा नंदी मानतो आणि आपल्या पित्याने त्याला आपला मुलगा म्हणून आपल्या पदरात टाकला आहे, म्हणतो. हेच नंदी बैलवाले सटवीचं पूजन करतात. बळीराजाचा विधी आटोपल्यावर बाराव्या दिवशी सटवी पूजनाचा कार्यक्रम होतो. भीतीपोटी हा विधी केला जातो. आंब्याची पाने, हळद-कुंकू आणि पान-सुपाऱ्या बळीराजासमोर ठेवून सटवी पुजली जाते. यांच्यात वनवासाला जाण्याची प्रथा आहे. आपला आदर्श पुरुष राम होता. रामाला चौदा वर्षे वनवास भोगावा लागला, म्हणून स्वत:ही श्रावण महिन्यात पुरुष अनवाणी पायाने घरसंसार सोडून एक महिना वनवासात जातात. भटक्या-विमुक्त जमाती या जादूटोणा, करणीधरणी, भूतपिशाच्च आदींवर विश्वास ठेवणाऱ्या. कोणतेही संकट किंवा रोगराई आली तर प्रथम शकून, अंगारा, धुपारा, राख लावून, पाणी मारून, गंडादोरा, लिंबू वारून नवससायास करणाऱ्या. त्यांना प्रेरणा देणाऱ्या या दंतकथा. बऱ्याच अंशी लैंगिकतेशी संबंधित असलेल्या.
वडार समाजाच्या उत्पत्तीसंबंधीच्या इतरही दंतकथांची उत्पत्ती मुख्यत्वे रामायण, महाभारत आणि पुराणांतूनच झाल्याचे दिसून येते. त्याच पुराणकथा लोक वंशपरंपरेने सांगत आलेत. ज्यात एक ‘सतीजसमा ओडण’. गंगाकिनारी अगस्ती ऋषीचा शिष्य नल ऋषी घोर तपस्या करीत होता. इंद्राने त्याची तपस्या भंग करण्यासाठी अप्सरा पाठवल्या. सौंदर्याची खाण असलेल्या अप्सरा कामकुंडलावर नल ऋषी मोहित झाला. मात्र स्वर्गसुंदरी असल्याने कामकुंडलेने इंद्रिय भोग देण्याला नकार दिला. नल ऋषीने क्रोधीत होऊन तिला पृथ्वीवर जन्मशील आणि तुला काळा वड्डर नवरा मिळेल, असा शाप दिला आणि तसेच घडले.
ही कथा गुजराती भाषेत ‘जसमा ओडणची रासडो’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘पुलवारी मेलडी माता-ओड अवतार’, ‘पंचवटीतील शिळा’, ‘सीतेचा शाप’. पंचवटीत सीता अंघोळ करीत होती, तेव्हा तिला एका वडाराने चोरून पाहिले. सीता गेल्यावर वडाराने शिळा तोडून नेली. हे कळल्यावर सीतेने शाप दिला, की तू यापुढे दगडच फोडत राहशील व तुझ्या लेकीबाळींना चोळीची आण राहील.
दुसरी एक चोळीची पुराणकथा अशी आहे- सीतेने सोनेरी हरणाच्या कातड्याची चोळी घालण्याचा मोह केला. ती तिला मिळाली नाही. चोळीमुळेच रामायण घडले, असे समजून सीतेला माता मानणाऱ्या वडार स्त्रियांनी सीतेला चोळी मिळाली नाही, म्हणून चोळीचा त्याग केला.
डक्कलवार ही सर्वात खालची जात. हे किंगरी वाजवून पुराणकथा सांगणारे मांगांचे मागते, पण शिवाने वर दिलेला. दख्खन मुनीचे वंशज म्हणून त्यांना स्वत:चा अभिमान आहे. मात्र पुराणातल्या महाकाव्यांनी त्यांना गुलाम बनवले, वर्णबाह्य ठरवले. त्याच या जमाती आपला काल्पनिक इतिहास शोधताना दिसतात. दुर्दैवाने, त्यांचा खरा इतिहास काल्पनिक करून टाकण्यात आला आहे. हे सर्व त्यांच्याकडे पोहोचवलं कुणी, तर त्यांचेच भटके भाऊबंद गोसावी, रावळ, नाथपंथी दशनाम गोसावींनी. यांचे साडेबारा पंथ मानले जातात.
आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची पडझड थांबविण्यासाठी चार पीठांची स्थापना केली. ऋषीमुनींना वेगवेगळी दहा प्रकारची कामे दिली. त्या कामांची विभागणी करून गोसाव्यांच्या दहा गटांना कॉण्ट्रॅक्ट सोपवले म्हणून दशनाम गोसावी. या दहा गटांनी हिंदू धर्म प्रसार आणि रक्षणाचा विडा उचलला. गिरी-दऱ्याखोऱ्यांत, भारती-भारतभ्रमणांतून, बन-बनात जाऊन, पर्वत-पर्वताच्या पायथ्याशी सागर-सागर किनारी, तीर्थ-तीर्थ निवासी, सरस्वती हे आचार्य, पुरी-पीठे सांभाळीत, अरण्य-अरण्यातील लोकांना, आश्रम-आश्रम स्थापणारे अशाप्रकारे देवाची लेकरे म्हणून, देवाची आज्ञा मानून सनातनी धर्मप्रसाराचे काम करणारी ही जमात.
भटक्या-विमुक्तांच्या सर्व जमातींमध्ये बहुतेक सर्व देवींचे पूजक, मातृसत्ताक. सातीदेवीची संकल्पना सर्वांमध्ये रूढ आहे. त्यात कुलाचारानुसार थोडाबहुत फरक दिसेल. याशिवाय सर्वांचा आदिपुरुष हा महादेवच आढळतो. त्यांच्या मिथककथा या निसर्गाच्या अधिक जवळच्या आहेत. शिव, नाथ, मातृसत्ताक अशा स्वरूपाच्या मिथकांतून त्यांची परंपरा एतद्देशीय, द्रविडी, नागवंशीय लिंगीशिंगी असल्याचे सांगता येईल.
आज मिथकांच्या समर्थनाचे अनेक प्रमाद निर्माण झाले आहेत. पण विज्ञानयुगात मिथकांची सत्यता पडताळण्याची गरज आहे. खरंच ही मिथके मानवी जगण्याला समाधान मिळवून देतात का? जर समाधान मिळते, तर ते कोणत्या स्वरूपाचे असते? असे प्रश्न पडतात. ज्ञान, विचार आणि विज्ञानाच्या कसोटीवर ज्यांची सिद्धता होते, अशी मिथके वगळली तर बाकी भाकडकथा म्हणूनच शिल्लक राहतात, एवढे मात्र खात्रीशीरपणे सांगता येईल.

संदर्भ :- veerarathod2@gmail.com
Comments
Post a Comment