Skip to main content

Shree biroba devstan, arewadi

Shree biroba devstan, arewadi
धनगरांचे मुख्य दैवत आहे “बिरोबा’ आणि त्यांची आई सुरावंती. या ओव्यांमध्ये बिरोबांच्या आईची माहिती तपशीलवार सांगितली जाते . तसेच बिरोबांची जन्मकथासुद्धा सांगितली जाते . यानंतर बिरोबांच्या मानलेल्या बहिणीची म्हणजे मायक्काची आणि बिरोबांच्या पत्नीची म्हणजे कामाबाईची माहिती “गाण्या’त व “कथे’तून सांगितली जाते .कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी गाव म्हटले,की डोळ्यांपुढे उभे राहते बिरोबा देवस्थान.बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.बिरोवा दैवत लिगायत आहे. ब्रम्हा,विष्णू,महेश या मूर्ती बिरोबा मंदिरात आहेत,कर्नाटकातूनच हे देव डोंगरावर आले.या डोंगरावरूनच देव भक्ताच्या दर्शनासाठी आरेवाडीच्या बनात आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.बिरोबाच्या उजव्याबाजूला बिरोबाचा भक्त सुर्‍याबा याचे मंदिर आहे.त्याच्या पलीकडे मायाक्कादेवीचे मंदिर आहे.
यात्रेला येणारा धनगर समाज यात्रेच्या तिसर्‍या दिवशी बकरीचा बळी देतात. ही बकरी बिरोबाला बळी दिली जात नाहीत व नैवेद्यहि दाखवला जात नाही.धनगर समाज मेंढपाळ व्यवसाय करणारा असल्याने यात्रे निमित्त आलेला असतो.तो मांसाहारी जेवणासाठी बळी देतो. नैवेद्य बिरोबाला नव्हे ते सुर्‍याबाला दाखवतात असे त्याचे म्हणणे आहे. यात्रेच्या कालाधीत बिरोबाची रात्री दहा नंतर पालखी निघते. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पहाटॆ पर्यत काढली जाते. याच पध्दतीने नवरात्र उत्सवात देखील घटस्थापने पासून विजयादशमीपर्यत पालखी काढली जाते.बिरोबा देवाला जाण्यासाठी मिरज-पंढरपूर मार्गावरील नागज फाटा येथे उतरून जावे लागते.नागज फाटा ते आरेवाडी अंतर अडीच किलो मीटर आहे. बनात जाण्यासाठी येथूना खासगी वाहतूक व बसेसची सोय आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून आरेवाडी येथील श्री बिरोबा मंदिर अनादिकालापासून परिचित आहे. साधारण आठ फूट लांब व आठ फूट रुंदीचा ऐतिहासिक गाभारा व वीस फूट लांब, वीस फूट रुंदीचा सभामंडप असलेले हे मंदिर. आरेवाडी, ढालगाव व नागज या तिन्ही गावांच्या सीमेवर वसलेले हे मंदिर जरी असले तरी, या देवावर श्रद्धा आहे ती जास्त आरेवाडीकरांचीच. या देवाला येण्या-जाण्यासाठी पूर्वी वाहने खूप कमी असायची. मात्र बर्याच वर्षाच्या कालावधीनंतर हळूहळू रस्ते, वाहने यांची सोय होऊ लागली. पूर्वी वीज,पाणी, बस थांबण्यासाठी निवारा, आरोग्य सुविधा या पायाभूत सुविधा नव्हत्या, त्या आता उपलब्ध आहेत. गुढीपाडव्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या गावडे बंधूंचा मानाचा गोड नैवेद्य, सहाव्या दिवशी म्हणजेच षष्ठीला सार्वजनिक गोड नैवेद्य व सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला मुख्य दिवस असतो, तो म्हणजे बकरी कापण्याचा. श्री बिरोबा हा लिंगायत असल्याने त्याला खारा नैवेद्य चालत नाही. मात्र त्याचा भक्त सूर्याबा, जो बिरोबाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न आहे, त्याला हा खारा नैवेद्य चालतो. 1997 मध्ये शिवाजीराव बापू शेंडगे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. त्यावेळी बापू धनगर समाजाचे नेते व माजी राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. मंदिर बांधकामासाठी नानासाहेब सगरे यांची मदत झाली हे मंदिर `ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे व सुमारे पंचवीस कोटींचे हे मंदिर उभे राहील. सध्या पाणी मुबलक प्रमाणात आहे, ते जल स्वराज्य प्रकल्पामधून. हॉटेल्स, थंडपेये, मेवा-मिठाईची दुकाने, रसघाणे, किराणा दुकाने आदी सुविधा आहेत. दोन कोटी खर्चाचे मंदिरही उभे राहिले आहे, ते लोकवर्गणीतून. मात्र यापुढील सर्व सोयी-सुविधांसाठी वीस कोटी रुपये मंदिराच्या विकासासाठी मंजूर केले आहेत, ते पर्यटनस्थळ विकासाच्यादृष्टीनेच. भविष्यात या ठिकाणी एक हजार भाविकांना एकाचवेळी सर्व सुविधांनी राहण्याची सोय, अन्नछत्र, अंतर्गत रस्ते, प्रवेशद्वार, वाहनतळ, बगीचा, वृक्षलागवड, दुकानगाळे, पोहण्याचा तलाव, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नियोजन, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध होतील. आरेवाडीचा बिरोबा म्हटलं की, पूर्वी श्रद्धेने असो किंवा बिरोबाच्या भक्तास सूर्याबाला असो, बकरी मोठय़ा प्रमाणावर कापली जायची. पाहुणे, इष्ट मित्र त्यानिमित्ताने यायचे. मोठी प्रथाच निर्माण झाली होती. मात्र कालांतराने अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या संघटनांनी बकरी अंधश्रद्धेने कापू नयेत म्हणून प्रबोधन केले. देवाच्या नावावर पशुहत्या करू नका असा औरंगाबादच्या खंडपीठानेही निकाल दिला. त्यामुळे आज उघडय़ावर बकरी कापणे, मंदिर परिसरात पशुहत्या करणे यासारख्या बाबी बंद झाल्या आहेत. भाविक आता प्रशासन, न्यायालय यांच्या भूमिकेचा आदर राखून अंधश्रद्धेला फाटा देऊन ही यात्रा मोठय़ा उत्साहात व शांततेत पार पाडतात. हे तीर्थक्षेत्र देशा

Comments

Popular posts from this blog

आद्यसमाजक्रांतिकारक श्रीगोविंदप्रभू यांचे विषयी माहिती आहे काय?

पुराणकथा

संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali)